अशोक पाटील खूनप्रकरणातील चारही आरोपींना शनिवारी न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
    अशोक पाटील यांचा चार दिवसांपूर्वी गोळय़ा झाडून खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शनिवारी पोलिसांनी कोगनोळी नाका येथे पकडले होते. खुनासाठी वापरलेली हत्यारे व वाहनेही जप्त केली होती. आरोपींना पुढील तपासासाठी गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आले आहे. या विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी दिलीप जाधव, त्याचा भाऊ अमोल जाधव, हरीष पाटील व ओंकार सूर्यवंशी या चौघांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. ताम्हणे यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील आर. आर. देशपांडे यांनी आरोपींना दोन आठवडे पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. आरोपींचे वकील बी. डी. राखुंडे यांनी युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने आरोपींना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपींसमवेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Gautam Navlakha
नजरकैदेत ठेवण्याची मागणी गौतम नवलखांना पडली भारी; एनआयएनं दिलं १.६४ कोटींचं बिल
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी