उघडय़ावरील आंगणवाडय़ांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेला ४ कोटी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती महिला बाल कल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे यांनी दिली. राज्य सरकारने १३ व्या वित्त आयोगातुन खास बाब म्हणून हा निधी उपलब्ध केला आहे. काकडे यांनी त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
या निधीतुन ९० आंगणवाडय़ांची बांधकामे हाती घेतली जाणार आहेत. पुर्वी मंजुर करण्यात आलेल्या आंगणवाडय़ांसाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उघडय़ावर भरणाऱ्या आंगणवाडय़ांची संख्या अधिक असल्याने त्यासाठीही निधी मिळवण्याचे प्रयत्न आहेत, असे काकडे यांनी सांगितले.