सुलभ हप्त्याने सोन्याचे दागिने खरेदीची योजना सुरू करून त्याआधारे ग्राहकांना जाळय़ात ओढून, कोटय़वधीची फसवणूक करणा-या दाम्पत्य व अन्य दोन अशा चार जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फसवणुकीच्या प्रकारामुळे संबंधित पैसे गुंतवणा-यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
येथील तलाबकट्टा भागात कृष्णा संकुलातील ३ दुकाने भाडय़ाने घेऊन श्री साईकृपा इन्शुरन्स अँड मार्केटिंग सव्र्हिसेस या नावाने कंपनी सुरू करण्यात आली. या अंतर्गत सुलभ हप्त्याने सोन्याचे दागिने खरेदीची योजना सुरू करण्यात आली. परंतु ग्राहकांना कोटय़वधींना गंडवून कंपनीचा मालक वीरभद्र हांडेकर, त्याची पत्नी जयश्री, रवि बांगर ऊर्फ रॉबर्ट व संजय हलगे (सर्व हिंगोली) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणी गजानन इंगोले यांनी पोलिसात तक्रार दिली. फिर्यादी इंगोले यांची १ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. इंगोले यांनी तक्रार केल्यानंतर इतर ग्राहकांना जाग आली. आता तेही पोलिसात तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत. िहगोलीच्या फलटण भागातील गफारभाई गौस शेख महेमूद यांना ९ हजार रुपयांना फसविण्यात आले. याशिवाय फसवणूक झालेल्या मुकेश शर्मा (९ हजार २०० रुपये), शेख फिरोज शेख छोटे (१५ हजार रुपये), सचिन रामावत (४ लाख ५० हजार), लीला िशदे (सव्वादोन लाख रुपये), रवि सावळे (९ हजार ५००), सुरेखा ठोंबरे (१५ हजार रुपये) आदींनी पोलिसात तक्रारी दिल्या.
दरम्यान, या कंपनीच्या कार्यालयास पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी मंगळवारी सील ठोकले. आरोपींनी मूळ दस्तऐवज सोबत नेले असून, पोलिसांनी कार्यालयातून बनावट शिक्के व दस्तऐवज जप्त केले. या प्रकरणात आतापर्यंत ९ लोकांच्या तक्रारी आल्या आहेत.