परभणी शहर महापालिकेच्या २०१४-१५ या आíथक वर्षांच्या तब्बल ४०० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास सोमवारी मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभापती विजय जामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीत हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
प्रारंभी माजी नगराध्यक्ष आबासाहेब देशमुख परळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बी. रघुनाथ सभागृहात बठकीस प्रारंभ झाला. आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांच्या वतीने उपायुक्त दीपक पुजारी यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. लेखाधिकारी शिवाजी सोळंके यांनी वाचन केले. नगरसचिव चंद्रकांत पवार यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. नवे अंदाजपत्रक ३९४ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचे आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला चालना देणारा असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
नव्या आर्थिक वर्षांत येत असलेल्या शासकीय अनुदानावरच महापालिकेच्या संकल्पित विकासकामांची भिस्त अवलंबून आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पाणीपुरवठा योजना, अल्पसंख्याक बहुलक्षेत्र विकास योजना, राजीव गांधी आवास योजना, नगरोत्थान अशा विविध योजनांच्या नावे भविष्यात येणाऱ्या रकमांवर या अर्थसंकल्पाचे गणित अवलंबून आहे. दरम्यान, महापालिकेच्या वतीने क्रीडाक्षेत्रासाठी २ टक्के, अपंग कल्याण पुनर्वसनासाठी ३ टक्के, खंडोबा यात्रेसाठी २ लाख, परभणी फेस्टीव्हलसाठी १० लाख, तर महिला व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी ५ टक्के तरतूद करण्यात आली.
अंदाजपत्रकाच्या बठकीत स्थानिक संस्था कराचा मुद्दाही निघाला. स्थानिक संस्था कराची वसुली अपेक्षित झाली नसून, व्यापाऱ्यांची नोंदणीही कमी झाली आहे, याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. शहरातील घरपट्टी, नळपट्टीची थकबाकी वसूल करावी, शहरात मनपातर्फे असलेल्या वेगवेगळ्या व्यापारी संकुलांची अनामत रक्कम वाढवून भाडेवाढ करावी, असे उत्पन्नाचे पर्यायही सुचवण्यात आले. राजीव गांधी आवास योजनेंतर्गत १२० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल केला असून, घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांकडून १५ टक्के, तर मनपाचा ५ टक्के सहभाग राहील, असे शहर अभियंता रमेश वाघमारे यांनी सांगितले. अर्थसंकल्पावरील चच्रेत नगरसेवक डॉ. विवेक नावंदर, उदय देशमुख, अश्विनी वाकोडकर, दिलीप ठाकूर आदींनी सहभाग घेतला.