News Flash

यशवंत कृषी प्रदर्शनात ख्यातनाम उद्योगांसह चारशे दालने, पाच हजार पशुधनाचा सहभाग

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान, आयोजित यशवंत कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन यंदा दशकपूर्ती साजरी करीत असल्याने हे

| November 22, 2013 02:00 am

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान, आयोजित यशवंत कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन यंदा दशकपूर्ती साजरी करीत असल्याने हे देशातील सर्वात मोठे प्रदर्शन साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रदर्शनात ४००हून अधिक दालने, ५ हजारांवर पशुधन तसेच ख्यातनाम उद्योग दालनांचा सहभाग राहणार असल्याची माहिती कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती दाजी पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली. बाजार समितीच्या पदाधिका-यांसह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की बैल बाजार आवारात आयोजित या भव्य अन् दिव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाणांच्या २९व्या पुण्यतिथीदिनी समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी राहणार असून, राज्याच्या मंत्रिमंडळातील कृषी, औद्योगिक व पशुसंवर्धन खात्याचे मान्यवर मंत्री व उच्चपदस्थ अधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते बक्षीस वितरण व स्मरणिका प्रकाशन होऊन समारोप होणार आहे. प्रदर्शनाला यंदा १० लाखांवर शेतकरी व नागरिक भेट देतील असा विश्वास व्यक्त करताना, स्टॉलधारकांसाठी, तसेच प्रदर्शन पाहण्यास येणा-यांसाठी आवश्यकत्या सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे दाजी पवार यांनी सांगितले. यंदा प्रथमच मोठय़ा प्रमाणात परदेशी कंपन्यांचा सहभाग राहणार असून, सुमारे दोनशे प्रकारचा परदेशी भाजीपाला, धान्य महोत्सव, नावीन्यपूर्ण औजारे प्रदर्शन, पीक स्पर्धा व प्रदर्शन, नव्या, जुन्या ट्रॅक्टरचा भव्य लोन मेळा, पिलरलेस डोम मंडप, कृषी व पणन विभागाचा २२ हजार चौरस फूट डिस्प्ले ही यंदाच्या प्रदर्शनाची खास वैशिष्टय़े आहेत. तसेच साखळी सिमेंट बंधारा, आदर्श बाजार समिती, सूक्ष्मसिंचन व पाणलोट विकास यंत्रणा, थेट भाजीपाला विक्री, आदर्श गाव, ठिबक सिंचन व रेनगन, सौरऊर्जा नियंत्रित पाणी व्यवस्थापन, हायड्रोपोनिक तंत्रज्ञान डेमो व अझोला पशुखाद्य ही वैशिष्टय़पूर्ण मॉडेल्स प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहेत. येत्या रविवारी (दि. २४) ऊसपीक व नावीन्यपूर्ण कृषी आयुधे, औजारे निर्मिती स्पर्धा. सोमवारी (दि. २५) केळी घड प्रदर्शन. मंगळवारी (दि. २६) फुले व गाय, म्हैस, बैल या पशुधनाच्या स्पर्धा. बुधवारी (दि. २७) फळे तसेच श्वान प्रदर्शन व स्पर्धा. गुरुवारी (दि. २८) भाजीपाला, पीक तसेच शेळी, मेंढी, पक्षी प्रदर्शन व स्पर्धा अशा प्रदर्शन व स्पर्धाचे भरगच्च आयोजन करण्यात आल्याचे सांगताना, याचा बहुसंख्येने लाभ घेण्याचे आवाहन दाजी पवार यांनी केले आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:00 am

Web Title: 400 galleries 5 thousand cattle wealth with celebrities industry participating in yashwant agriculture exhibition
Next Stories
1 निर्दोष सुटलेल्यांना उच्च न्यायालयात शिक्षा
2 सीईओविरुद्ध अविश्वासाचा इशारा
3 शेतीच्या वादातून पुतण्याचा खून, दोघांना अटक
Just Now!
X