अण्णा भाऊ साठे आíथक विकास महामंडळाच्या महिला समृद्धी विकास योजनेंतर्गत लघुउद्योगांसाठी परळीतील ७० महिलांना ४४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. विधान परिषदेचे माजी सदस्य धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रथमच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्ज करण्यापासून प्रस्ताव मंजूर करेपर्यंत मुंडे यांनी याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे प्रथमच एका तालुक्यात इतकी मोठी रक्कम लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे. अण्णा भाऊ साठे आíथक विकास महामंडळातर्फे महिला समृद्धी योजनेंतर्गत घरगुती लघुउद्योगांसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान व कर्जपुरवठा केला जातो. मात्र, ज्यांची ओळख आहे, असेच लोक याचा फायदा घेतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. या पाश्र्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी तालुक्यातील गरजू व होतकरू महिलांचा शोध घेऊन त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. ज्यांना ही योजना माहीत नाही, अशा महिलांना योजनेचा लाभ यातून मिळाला.
मागील महिन्यात अशा गरजवंत महिलांकडून अनुदानाचे अर्ज भरून घेण्यापासून प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या हातात धनादेश देईपर्यंत मुंडे यांच्याकडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. अंबाजोगाई येथे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या लाभार्थ्यांना धनादेश दिले.