News Flash

सावेडी परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ, मारहाणीत ५ जखमी

शहरातील सावेडी व नागापूर परिसरात रात्री चोरटय़ांच्या टोळीने धुमाकूळ घालत नागरिकांना मारहाण करीत सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लुटला. चोरटय़ांच्या मारहाणीत पाचजण जखमी झाले.

| August 12, 2013 01:58 am

शहरातील सावेडी व नागापूर परिसरात रात्री चोरटय़ांच्या टोळीने धुमाकूळ घालत नागरिकांना मारहाण करीत सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लुटला. चोरटय़ांच्या मारहाणीत पाचजण जखमी झाले. टोळीच्या शोधासाठी पोलिसांनी आज दिवसभर मोहीम राबवली, परंतु शोध लागला नाही.
एमआयडीसीजवळील नागापूरमधील नामदेव बबन वाघ, त्यांचा भाऊ राजू बबन वाघ व काळे नावाचे वृद्ध गृहस्थ तर सावेडी भागातील डॉन बास्को शाळेच्या मागे राहणारे रोहित एकनाथ जाधव व नीलेश हृषिनाथ जाधव हे पाचजण चोरटय़ांनी तलवार, लोखंडी टॉमीने केलेल्या मारहाणीत जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या चोरटय़ांची टोळी एकच असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
चोरटे तीन-चारच्या संख्येने होते, त्यांनी प्रथम नागापूरमधील वाघ कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, घरातील लोकांना मारहाण केली, आरडाओरडय़ामुळे त्यांना ऐवज लुटता आला नाही, परंतु त्यांनी परिसरातील घरांना बाहेरून कडय़ा लावल्या होत्या. रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. नागरिक मदतीस धावल्याने चोरटे पळून गेले. जाताना त्यांनी काळेवस्तीवर जाऊन तेथील दरवाजा तोडला, तेथे गोठय़ात झोपलेले वृद्ध काळे यांना मारहाण केली, तेथही काही न मिळाल्याने चोरटे जवळच असलेल्या सावेडीतील डॉन बॉस्को शाळेच्या मागील वसहातीत गेले.
तेथे रात्री अडीचच्या सुमारास जाधव यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तेथील लोकांना लोखंडी टॉमीने मारहाण केली. जाधव यांच्याकडील सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज पळून नेला. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली आहे. एमआयडीसी व तोफखाना पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्य़ांची नोंद केली आहे. रात्री व आज दिवसभर परिसरात शोध मोहीम राबवली. काही ठिकाणी छापेही टाकले, परंतु शोध लागला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:58 am

Web Title: 5 injured in rampage of thieves
टॅग : Injured
Next Stories
1 गट नं १५च्या बेकायदा वाटपप्रकरणी कार्यकर्त्यांचे जलसमर्पण
2 महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
3 शिराळ्यात नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी
Just Now!
X