News Flash

परभणी महापालिकेकडून ५० कोटींच्या विशेष अनुदानाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

परभणी शहरातील पायाभूत सुविधांसाठी ५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात यावे, अशी मागणी महाालिकेच्यावतीने गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

| May 31, 2013 01:52 am

परभणी शहरातील पायाभूत सुविधांसाठी ५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात यावे, अशी मागणी महाालिकेच्यावतीने गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. चव्हाण हे कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आले असता महापौर प्रताप देशमुख, स्थायी समिती सभापती विजय जामकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारेंसह सदस्यांनी त्यांची भेट घेतली.
यूआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजनेंतर्गत विविध कामांसाठी ७७.७४ कोटी, शहर पर्यटन विकासासाठी २६.१३ कोटींची मागणी करण्यात आली. जलकुंभ, अग्निशामक केंद्र, यांत्रिकी वर्कशॉप, प्रशासकीय कार्यालय, अधिकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, आदींसाठी उड्डाणपुलाजवळील गोरक्षणची जागा महापालिकेला हस्तांतरित करावी, अशीही मागणी करण्यात आली. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार २० कोटी रुपयांचे विशेष अर्थसहाय्य मंजूर करावे तसेच कृषी विद्यापीठाची तीन एकर जागा विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करावी, दलित वस्ती सुधारण्यासाठी १० कोटी देण्यात यावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेने स्थानिक संस्था कर ४० टक्के कमी करण्याबाबत घेतलेल्या ठरावास मंजुरी देण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली असल्याचे महापालिकेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 1:52 am

Web Title: 50 cr special grant demand to cm from parbhani corporation
Next Stories
1 जालन्यातील ७० टक्के लोकसंख्या टँकरवरच!
2 हिंगोली बसस्थानकात घाणीचे साम्राज्य
3 मराठवाडय़ात बारावीच्या निकालात पुन्हा मुलीच ‘अव्वल’
Just Now!
X