News Flash

कोयना धरणाचा पाणीसाठा गतवर्षीपेक्षा दुपटीहून जादा

महाकाय कोयना धरणाचा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून जादा आहे. गतवर्षी आजमितीला ७४.६७ टक्के धरण रिते होते. मात्र, यंदा जून महिन्याच्या अखेरीस सरासरी ५२ टक्के धरण

| July 2, 2013 02:02 am

महाकाय कोयना धरणाचा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुपटीहून जादा आहे. गतवर्षी आजमितीला ७४.६७ टक्के धरण रिते होते. मात्र, यंदा जून महिन्याच्या अखेरीस सरासरी ५२ टक्के धरण भरले आहे. चालू हंगामातील २४ दिवसात धरणात सुमारे २५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद १३ हजार ६०६ क्युसेक्स पाणी मिसळत आहे. पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी सुमारे चौपट पाऊस झाला आहे. परिणामी गेल्यावर्षी ३० जुलैला ५० टक्के भरलेले कोयना धरण या खेपेस तब्बल एक महिना अगोदरच भरले आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्’ाातील पावसाची तालुकानिहाय सरासरी व कंसात एकूण पाऊस- सातारा ९.४(२६६.३), जावली १३.१(५४४.२), कोरेगाव १.३(१५८.८), फलटण ०.५(१००.१), माण शून्य (६८.२), खटाव १(९९.१), वाई ३.९(२८७.३), महाबळेश्वर १३.९ (६३९.७) तर खंडाळा तालुक्यात २.६ एकूण १७९.५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना शिवसागर अर्थात कोयना धरणाचा पाणीसाठा आज दुपारी २ वाजता ५४.५६ टीएमसी म्हणजेच जवळपास ५२ टक्के असून, गतवर्षी आजमितीला हाच पाणीसाठा २६.६६ टीएमसी म्हणजेच २५.३३ टक्के  असा चिंताजनक होता. धरणक्षेत्रात गतवर्षी आजमितीला सरासरी ५९९.६६ मि. मी., यंदा हाच पाऊस १५९३.७५ मि. मी. म्हणजेच ६२.३८टक्के जादा पाऊस झाला आहे. धरणाखालील कराड तालुक्यात गतवर्षी आजअखेर ७६ मि. मी. पाऊस झाला होता. सध्या सरासरी १७२.३ मि. मी. पाऊस नोंदला गेला असून, गतवर्षीच्या तुलनेत तो ५६ टक्क्यांनी जादा आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण क्षेत्रातील नवजा व हेळवाक वगळता सध्या २९२.३ मि. मी. पावसाची नोंद असून, गतवर्षीपेक्षा सुमारे ६७ टक्क्याने जादा कोसळला आहे. यंदा कोयना धरणक्षेत्रातील प्रतापगड विभागात सर्वाधिक १६४८ मि. मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी नवजा विभागात आजअखेर सर्वाधिक ७२४ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. चालू हंगामात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात १५३३ मि. मी., नवजा विभागात १६१८, महाबळेश्वर विभागात १५९६ पाऊस नोंदला गेला आहे. हा सरासरी पाऊस १५९३.७५ मि. मी. असून, गतवर्षी हाच सरासरी पाऊस ५९९.६६ मि. मी. नोंदला गेला आहे. याखेपेस आजअखेर ६२.३८ टक्के जादा पाऊस झाला आहे. गतवर्षी महाबळेश्वर विभागात ५५१ तर, कोयनानगर विभागात ५२४ मि. मी. पावसाची नोंद झाली होती.
आज सकाळी ८ ते २ या सहा तासात कोयना धरणक्षेत्रात सरासरी २७ मि. मी.,पाऊस कोसळला आहे. तर, आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात पाटण तालुक्यात ७.५ तर कराड तालुक्यात ४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात या दोन्ही तालुक्यात पावसाची उघडझाप राहिल्याचे वृत्त आहे. समाधानकारक पावसामुळे खरिपाच्या पेरण्या उत्साहात पार पडत असून, कोयना धरण तुलनेत अगदीच लवकर भरण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी ४ सप्टेंबरला कोयना धरण क्षमतेने भरल्याने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फुटाने उचलून कोयना नदीपात्रात ९ हजार ४८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. यंदामात्र प्राप्त परिस्थिती पहाता गतवर्षीच्या तुलनेत किमान १ महिना अगोदर म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापूर्वीच कोयना जलाशय शिगोशिग भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच कोयनेच्या दुसऱ्या आणि ऐतिहासिक लेक टॅपिंगच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रासह शेजारच्या चार राज्यांना विजेचा लखलखाट देणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती अखंड आणि पूर्ण क्षमतेने कायम राहिल असे तूर्तास दिसून येत आहे.
गतवर्षी ५ जूनला पावसाने जोरदार हजेरी लावून सलग २० दिवस दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्णत: धोक्यात आल्या होत्या. याखेपेस मात्र, पावसाने पहिल्या सत्रात जोरदार हजेरी लावल्याने गतवर्षीच्या तुलनेत भरपूर पाऊस कोसळल्याची समाधानकारक आकडेवारी असून, दरम्यान, सातारा जिल्’ाातील दुष्काळी तालुक्यातही कमी, अधिक प्रमाणात पाऊस कोसळल्याने दुष्काळाच्या चर्चेला आजमितीलातरी विश्रांती मिळून प्रशासनाचा दुष्काळ निवारण्याचा ताण कमी झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:02 am

Web Title: 50 extra water stock in koyna dam than last year
टॅग : Koyna Dam
Next Stories
1 नवी वाहने द्यायची कोणाला?
2 सीईओ अग्रवाल यांच्यासह गारुडकर, दरेवार यांच्यावरील आदेशास स्थगिती
3 स्थायी समिती पुन्हा निम्म्या सदस्यांनिशी?
Just Now!
X