पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाशिकरोड येथील बी. आर. डी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या वतीने अंजनेरी येथे आयोजित जिल्हास्तरीय गिर्यारोहण निवासी शिबीरात ५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
पहिल्या दिवशी प्रा. योगेंद्र पाटील यांनी शिबीराचे नियम व उद्देश याबाबत माहिती दिली. भोसला अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनचे प्रशिक्षक संतोष जगताप यांनी रिव्हर व व्हॅली क्रॉसिंग, ट्रेकिंग याविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले व सर्व प्रशिक्षणार्थीकडून ते करवून घेतले. दुसऱ्या दिवशी पांडवलेणी येथे रॅपलिंगचे प्रात्यक्षिक सर्वानी केले. यात जिल्ह्यातील सिडको महाविद्यालय, के. के. वाघ पिंपळगाव महाविद्यालय, ओझर महाविद्यालय, निफाड माहविद्यालय, बी. आर. डी. महिला महाविद्यालय, केटीएचएम या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. निवासी गिर्यारोहण शिबीराचे समन्वयक म्हणून प्रा. योगेंद्र पाटील यांनी काम पाहिले.