19 October 2020

News Flash

जिल्हा परिषदेच्या सभेत ५६.३६ कोटींचे अंदाजपत्रक

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ५६ कोटी ३६ लाखांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. खरेदी योजनांवर भर असलेले हे अंदाजपत्रक बुधवारी अवलोकनार्थ सादर करण्यात आले.

| June 14, 2014 08:01 am

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ५६ कोटी ३६ लाखांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. खरेदी योजनांवर भर असलेले हे अंदाजपत्रक बुधवारी अवलोकनार्थ सादर करण्यात आले.
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच हुशार, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र आणि वाचनालयाचा ठरावही घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ज्युबिली हायस्कूल येथील प्रांगणावर स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र आणि वाचनालयात प्रस्तावित आहे. शिक्षण विभागाच्या निधीतून यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली. स्वयंसहाय्यता बचत समूहाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पही मंजूर झाला आहे. यामुळे बचतगटातील महिलांना रोजगारही मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुंभरे, उपाध्यक्ष गड्डमवार, सर्व सभापती, मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील आणि अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. खरेदी योजनांवर अंदाजपत्रकात भर देण्यात आला. पाणीपुरवठा योजनेवरील निधी कमी करण्यात आला. मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत २० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 8:01 am

Web Title: 56 36 crore budget in the meeting of district council
टॅग Chandrapur
Next Stories
1 ‘ग्रीन प्लॅनेट’चा पर्यावरण दिनाचा उपक्रम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हायजॅक
2 विकासकामे, प्रकल्पांचा गडकरी उद्या आढावा घेणार
3 पाऊस लांबल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त
Just Now!
X