धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. यावर्षी ४ लाख ६८ हजार क्विंटल धानाचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्य़ातील १ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. गोंदिया जिल्ह्य़ातील शेतकरी धान उत्पादनात वाढ करण्यासाठी लागवड पद्धतीत बदलाच्याषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेत आहेत. यामुळे धानाच्या उत्पादनात वाढ करणे शक्य होत आहे.
कृषीतज्ज्ञ व मार्केटिंग फेडरेशनच्या शेती पिकवण्याच्या पद्धतीने जिल्ह्य़ातील १३ हजारांवर शेतकऱ्यांनी ५८ कोटी रुपयांच्या धानाचे उत्पादन घेतले आहेत. त्यामुळे धानाची शेती शेतकऱ्यांसाठी आता खऱ्या अर्थाने लाभदायक ठरत आहे. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनकडे खरेदी केलेल्या धानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१२-१३ या वर्षांत १३ हजार ५८८ शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली होती. कापणीनंतर हा धान शासनाच्या मूलभूत किमतीच्या धोरणानुसार फेडरेशनच्या विविध केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नेला. या वर्षांत ५९ केंद्रांवर या धानाची खरेदी करण्यात आली. एकूण ४ लाख ६८ हजार ९७२ क्विंटल १५ किलो धानाची खरेदी करण्यात आली. चुकाऱ्यापोटी फेडरेशनने या धान उत्पादक शेतकऱ्यांना ५८ कोटी ६३ लाख ६८ हजार ७३९ रुपये ५० पसे एवढय़ा रकमेचे वाटप केले आहे.
तालुकानिहाय धान खरेदीची खरेदीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गोंदिया तालुक्यातील १३ केंद्रांवर ६४ हजार ९७६ क्विंटल, गोरेगाव तालुक्यातील सात केंद्रांवर ४४ हजार ५०३, तिरोडय़ातील १६ केंद्रांवर १ लाख २४ हजार ७२४, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० केंद्रांवर १ लाख २४ हजार ७२४ तर आमगाव तालुक्यातील चार केंद्रांवर ४५ हजार ४४५, नक्षलबहुल सालेकसा येथील दोन केंद्रावर ८ हजार ८८२ व सडक अर्जुनी तालुक्यातील सात केंद्रांवर ८१ हजार ८९१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. सर्व धानाची एकरकमी हुंडी शेतकऱ्यांना देण्यात आली. हा सर्व धान सरकारदरबारी जमा व्हावा म्हणून यातील अध्र्यापेक्षा जास्तधानाची भरडाई आटोपली आहे. अर्धा धान काही दिवसातच भरडाईला काढण्यात येणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्यावर्षीपेक्षा धानाच्या उत्पादनातही कमालीची वाढ झाली असल्याचे बोलले जाते. धान उत्पादकांचा जिल्हा ही ओळख कायम ठेवण्यात जिल्’ाातील शेतकरी यशस्वी ठरले आहेत. मूलभूत हमीभावाप्रमाणे दर मिळायला पाहिजे असल्यास शेतकऱ्यांनी ओला धान केंद्रावर विक्रीसाठी आणू नये, ओला धान असल्यास केंद्रावरून परत जाण्याची शक्यता आहे, असे आवाहन मार्केटिंग फेडरेशनचे गायकवाड यांनी केले आहे.