महात्मा गांधी तंटामुक्त योजनेंतर्गत सहाव्या वर्षांत तंटामुक्त झाल्याची घोषणा झालेल्या १९५ गावांपैकी जिल्हा मूल्यमापनात ५९ गावे पात्र ठरली आहेत. लवकरच जिल्हाबाह्य समितीकडून या गावांचे मूल्यमापन होणार आहे.
सन २००७पासून सुरू झालेल्या तंटामुक्त गाव मोहिमेला जिल्हय़ात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावातील तंटे गावातच मिटवून गावातील शांतता अबाधित राखण्यात तंटामुक्त समिती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जिल्हय़ात २०१२-१३ या सहाव्या वर्षांत सर्व गावांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मोहिमेच्या निकषानुसार १ मे रोजी गावांनी तंटामुक्त झाल्याचे जाहीर करणे बंधनकारक असते. जिल्हय़ातील १९५ गावांनी तंटामुक्त झाल्याचे जाहीर केले होते. जाहीर झालेल्या १९५ तंटामुक्त गावांचे मूल्यमापन करण्यासाठी जिल्हा मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आली. समितीने सर्व गावांचे मूल्यमापन करुन ५९ गावे जिल्हाबाह्य मूल्यमापनास पात्र ठरविली आहेत. दैठणा, िपपळदरी पोलीस ठाण्यांतर्गत एकही गाव पात्र ठरले नाही. उर्वरित सर्व पोलीस ठाण्यांतर्गत गावे तंटामुक्तीस पात्र ठरली आहेत.