जिल्हा नियोजन समितीकडून दलितेतर विकास योजनेंतर्गत मिळालेल्या ७ कोटी ५० लाख रुपये निधीतून शहरातील १४ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास महापालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. सन २०१४-१५मध्ये प्रत्येक प्रभागात कामे घ्यावीत, या साठी आवश्यक निधीसाठी पालकमंत्र्यांना विनंती करण्याचे एकमताने ठरले.
उपमहापौर सय्यद खालेद ऊर्फ सज्जूलाला यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ, दाऊदी बोहरा समाजाचे आध्यात्मिक गुरू डॉ. सय्यदना यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. नगरसेवक भगवान वाघमारे, अॅड. जावेद कादरी, सचिन देशमुख, उदय देशमुख, डॉ. विवेक नावंदर, दिलीप ठाकूर, अंबिका डहाळे, शांताबाई लंगोटे यांनी चच्रेत सहभाग घेतला. उपायुक्त दीपक पुजारी, नगर सचिव चंद्रकांत पवार उपस्थित होते.
सरकारी दवाखाना ते जिंतूर रस्ता, किंग कॉर्नर ते नवा मोंढा, जिल्हा परिषद जिंतूर रस्ता, बसस्थानक ते नीरज हॉटेल, उड्डाणपूल ते गव्हाणे चौक, शिवाजीमहाराज ते विसावा हॉटेल, अपना कॉर्नर ते जेल कॉर्नर, शिवाजीमहाराज पुतळा ते शाही मस्जीद, ग्रँड हॉटेल ते खंडोबा मंदिर, साहेबजान मस्जिद ते हॉटेल तंदुर, सी.सी. रस्ता व सी.सी.नाली, रमाबाई आंबेडकरनगर, संजय गांधीनगर ते अमरधाम िहदू स्मशानभूमीपर्यंत, भीमनगर रेल्वेगेट ते डॉ. शहाणे यांच्या घराजवळ, अजीजीया नगर, सिटी पोलीस चौकी ते शर्मा यांच्या घरापर्यंत, शास्त्रीनगर ते कलावती देवी मंदिर, आर. आर. पेट्रोलपंप ते दाते यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आली.