22 September 2020

News Flash

आठ लाखांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या विदेशी भामटय़ास अटक

५० लाख पौंडाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या घाना या देशातील भामटय़ास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

| June 27, 2013 01:42 am

५० लाख पौंडाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या घाना या देशातील भामटय़ास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मार्क ओबी पीटर असे या आरोपीचे नाव असून घाना देशातील आकारा येथील रहिवासी आहे. आरोपी व  त्याचा साथीदार फिलीप रिचर्ड, प्रिंग ओमोर यांनी संजय किसनराव खत्री यांना कोका कोला कंपनीकडून ५० लाख पौंडाचे बक्षीस मिळाल्याचे कळविले. त्यासाठी ८ लाख रुपये फिर्यादीकडून बँकेत आरोपीच्या खात्यात भरायला लावले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अरिहंतनगरमध्ये राहणाऱ्या संजय खत्री यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
५० लाख पौंडाचे बक्षीस लागल्याचे सांगत मार्क ओबी पीटर अरिहंतनगरमध्ये खत्री यांच्या घरी आला. तत्पूर्वी त्याच्या खात्यात फिर्यादीकडून त्याने ८ लाख रुपये भरून घेतले होते. २५ जून रोजी खत्री यांच्या घरी नकली नोटांना केमिकल लावून तो हातचलाखी करत होता. ही बाब खत्री यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी मार्क पीटर याला अटक करून त्याच्याकडून नकली नोटा, नोटांना लागणारे रसायन जप्त केले. त्याचा पासपोर्टही बनावट असल्याचे उघडकीस आले. तोही पोलिसांनी जप्त केला. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, गौतम गंगावणे यांनी आरोपीला शिताफीने पकडले.
मंगळसूत्र चोर अटकेत
शहरातील वेगवेगळय़ा भागातून मंगळसूत्र पळविणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अहमदनगर जिल्हय़ातील श्रीरामपूर येथील आरोपी राज फोलाद इराणी व फिरोज सुल्तान इराणी यांना पोलिसांनी अटक केली. मंगळसूत्र चोरीच्या गुन्हय़ातील एक सोन्याचे गंठण व चार मंगळसूत्र पोलिसांनी आरोपींकडून परत मिळविले. ६२ ग्रॅम किमतीच्या या दागिन्यांची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. पोलिसांना बऱ्याच दिवसांपासून मंगळसूत्र चोर गुंगारा देत होते. सिडको, सातारा, उस्मानपुरा व मुकुंदवाडी भागात या दोघांनीच मंगळसूत्र चोरल्याचे उघडकीस आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 1:42 am

Web Title: 8 lakhs cheating to show a bait one foreigner arrested
टॅग Cheating
Next Stories
1 औशाचे माजी आ. किसनराव जाधवांचा सेना प्रवेश
2 तलावात पोहण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
3 उडीद खरेदीत कोटय़वधींचा घोटाळा
Just Now!
X