कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कल्याण-डोंबिवली शहरांची लोकसंख्या २ लाख ३० ने वाढली आहे. पालिका हद्दीतील लोकसंख्या वाढल्यामुळे महानगरपालिका हद्दीत नव्याने ७ ते ८ प्रभाग निर्माण होतील. म्हणजे पालिकेत ७ ते ८ नगरसेवक वाढणार आहेत. या वेळी पालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग (पॅनल) पद्धतीने घेण्यात येईल, असे महापालिका सूत्राने सांगितले.
 निवडणुकीची सर्वतोपरी तयारी करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याप्रमाणे पालिकेची २०११ प्रमाणे वाढलेली लोकसंख्या, या लोकसंख्येच्या आधारे नव्याने निर्माण होणारे प्रभाग, त्यांची रचना, राखीव प्रवर्गाची संख्या, येणाऱ्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात येणार असल्याने त्या विषयीची लोकसंख्येप्रमाणे विभागणी याविषयीची इत्थंभूत माहिती संकलित करणे. त्याचे नियोजन करून त्याप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश शासनाने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत.

लोकसंख्येत वाढ
कल्याण-डोंबिवली महापालिका टिटवाळा ते कोपर, खडेगोळवली ते गंधारे अशी ६७.६५ चौरस किलोमीटर क्षेत्रात वसली आहे. २००१ च्या जनगणनेप्रमाणे पालिकेची लोकसंख्या १० लाख ४७ हजार २९७ होती. या लोकसंख्येप्रमाणे पालिका हद्दीत आता नगरसेवकांचे १०७ प्रभाग आहेत. ५ नगरसेवक स्वीकृत आहेत. एकूण ११२ नगरसेवक पालिकेत कार्यरत आहेत. २०११ च्या जनगणनेप्रमाणे पालिका हद्दीतील लोकसंख्या १२ लाख ४७ हजार ३२७ आहे. यामध्ये पुरुषांची संख्या ६ लाख ४९ हजार ६२६. महिलांची संख्या ५ लाख ९७ हजार ७०१ आहे. ‘अनुसूचित जमाती’ नागरिकांची संख्या १ लाख २१ हजार ८२७. यामध्ये पुरुषांची संख्या ६२ हजार १४३. महिलांची संख्या ५९ हजार ७५४. ‘अनुसूचित जाती’ नागरिकांची संख्या ३६ हजार ८६४ आहे. यामध्ये पुरुषांची संख्या १९ हजार ४४, महिलांची संख्या १७ हजार ८२० आहे. २००१ च्या लोकसंख्येचा विचार करता २०११ च्या जनगणनेप्रमाणे पालिका हद्दीतील लोकसंख्येत २ लाख ३० वाढ झाली आहे.

Nagpur Lok Sabha Small increase in voter turnout what does it signal
नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?
lok sabha election 2024 phase 1 of lok sabha polls registers 62.37percent polling despite heatwave
६२.३७ टक्के मतदान; पहिल्या टप्प्यात २०१९ पेक्षा ७ टक्के मतांची घसरण; त्रिपुरात सर्वाधिक
Home Voting for Elderly and Disabled Voters, Home Voting Facility Initiated, Home Voting nagpur district, lok sabha 2024, lok sabha phase 1, election 2024, election news,
मतदानापूर्वी गृहमतदान, काय आहे ही पध्दत?‘ हे ’ ठरले प्रथम गृह मतदार
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर