बँकेच्या खात्याची माहिती घेऊन खात्यावरील रकमेचा अपहार केल्याची घटना शनिवारी पारनेरमध्ये घडली. सेंट्रल बँकेचा व्यवस्थापक असल्याची बतावणी करून या भामटय़ाने पंचायत समितीतील कर्मचाऱ्यास साडेआठ हजारांना गंडा घातला.
पारनेर पंचायत समीतीचे पशुधन पर्यवेक्षक ओंकार शंकर गायकवाड यांना त्यांच्या मोबाइलवर शनिवारी सकाळी नऊ वाजता फोन आला. मी सेंट्रल बँकेचा मॅनेजर धीरजकुमार बोलतो आहे. तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे. त्याच्या नूतनीकरणासाठी साळवे यांच्या खात्याची एटीएमसंदर्भातील सर्व माहिती धीरजकुमार या भामटय़ाने घेतली. त्याद्वारेच त्याने साळवे यांच्या खात्यातून ८ हजार ४५१ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळवे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.