25 November 2020

News Flash

८० लाख रुपयांचे एमडी जप्त

पायधुनी पोलिसांनी गुरुवारी छापा घालून एक किलो एमडी (मॅफ्रेडॉन) हा अमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत ८० लाख रुपये आहे.

| January 10, 2015 06:44 am

पायधुनी पोलिसांनी गुरुवारी छापा घालून एक किलो एमडी (मॅफ्रेडॉन) हा अमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत ८० लाख रुपये आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
पायधुनी पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थाविरोधात मोहीम सुरू केली होती. एमडी हा अमली पदार्थ विकणारा एक पुरवठादार इक्बाल हामिद मेनन ऊर्फ तिकीट मशिद बंदर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कवळेकर यांच्या पथकाने छापा घातला.
मेननच्या घरातून पोलिसांनी एक किलो एमडी हा अमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत ८० लाख रुपये आहे. मेनन हा दक्षिण मुंबईतील अमली पदार्थ विकणाऱ्यांना एमडी पुरवत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:44 am

Web Title: 80 lakhs md powder seized
Next Stories
1 हे प्रभू तुम्ही पुन्हा पुन्हा या..
2 घरची धुणी धुवायची कोणी?
3 चिमुकलीची ‘विज्ञानसेवा’
Just Now!
X