शुल्काचे साडेदहा कोटी प्राप्त
गेल्या वर्षांत पासपोर्ट कार्यालयाने ८० हजार ३०९ पासपोर्टचे वितरण केले आहे. त्याचे शुल्क म्हणून १० कोटी ५८ लाख ४४ हजार ४०० रुपये प्राप्त झाले आहे. तर तात्काळ पासपोर्टचे शुल्क म्हणून १ कोटी ६५ लाख ५६ हजार रुपये मिळाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पासपोर्ट कार्यालयाला १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीतील काही माहिती मागितली होती. या माहितीनुसार वरील कालावधीत पासपोर्टसाठी एकूण ८४ हजार २५१ अर्ज कार्यालयाला प्राप्त झाले. पासपोर्ट मिळावे यासाठी सादर केलेले ९ हजार ७८१ अर्ज प्रलंबित आहेत. या काळात एकही अर्ज रद्द करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे या कालावधीत बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी एकही पासपोर्ट रद्द करण्यात आला नाही, तसेच बनावट पासपोर्ट असल्याचे आढळून आले नाही. पासपोर्ट तयार केल्यानंतर ते पोस्टाद्वारे घरी पाठवले जाते. परंतु पाठवलेल्या पत्त्यावर संबंधित व्यक्ती आढळून आले नसल्याने ४५७ पासपोर्ट कार्यालयाला परत मिळाले. २८ व्यक्तींनी आपले पासपोर्ट कार्यालयाला परत केले.
मानकापूर येथील इश्कप्रिया हाऊसिंग सोसायटीत पासपोर्ट सेवा केंद्राचे कार्यालय असून तेथे पा*+++++++++++++++++++++++++++र्+*गची समस्या आहे. पासपोर्टच्या कामासाठी कार्यालयात येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावर कुठेही उभी करतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतो. अशा तक्रारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. पा*+++++++++++++++++++++++++++र्+*गची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचेही एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.