23 September 2020

News Flash

बाभळवाडी येथे दगडफेकप्रकरणी २७ महिलांसह ८१ जणांना अटक

बाभळवाडी येथे सरपंचपदाच्या निवडीवरून झालेली दगडफेक आणि गोळीबाराच्या घटनेला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी २७ महिलांसह ८१ जणांना अटक

| December 19, 2012 03:01 am

बाभळवाडी येथे सरपंचपदाच्या निवडीवरून झालेली दगडफेक आणि गोळीबाराच्या घटनेला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी २७ महिलांसह ८१ जणांना अटक केली.
बाभळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक संवेदनशील असल्याची माहिती प्रशासनाकडे होती. सरपंचपदाच्या निवडणुकीवरून दगडफेक आणि जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार झाला. इतर ठिकाणाहून लोक गावात येऊ नयेत, यासाठी काही लोकांनी मध्यरात्रीच रस्ते खोदले होते. पोलिसांना हा प्रकार माहीत होता. तरीही प्रकरण गांभीर्याने घेतले गेले नाही.
परिणामी दगडफेक आणि जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्याची वेळ आली. गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गुंडांना सोडून गावातील नागरिकांना अमानुषपणे मारहाण केली. पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ८१ जणांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 3:01 am

Web Title: 81 arrested on stoned matter at babhalwadi
टॅग Arrest
Next Stories
1 २० हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्यास अटक
2 संभाजी सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
3 क्रेडिट कार्डद्वारे फसवणाऱ्या दोन भामटय़ांना अटक
Just Now!
X