भारतीय जलसंस्कृती मंडळामार्फत आठवे जलसाहित्य संमेलन कोल्हापूर येथे १९ व २० जानेवारी, २०१३ रोजी दहा विभागांत घेण्यात येणार आहे. संमेलनासाठी देशातील ५०० जलसाहित्याचे लेखक, अभ्यासक, निरनिराळ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, संमेलन पूर्णपर्ण शैक्षणिक आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल जगदाळे यांनी दिली आहे.
संमेलनाचे सर्वसाधारण स्वरूप पुढीलप्रमाणे- जलकलश िदडी व संमेलनाचे उद्घाटन, मुख्य  मान्यवरांची व्याख्याने, जल-साहित्यधारा विभाग, जल-साक्षरताधारा विभाग, जल-स्थापत्यधारा विभाग, लोकधारा विभाग, पर्यावरणधारा विभाग, प्रकट मुलाखत, मुक्तचिंतन विभाग, कवी संमेलन विभाग, पोस्टर प्रदर्शन विभाग, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग, समारोप कार्यक्रम विभाग, प्रशस्तिपत्रे, प्रमाणपत्रे, बक्षिसे वितरण कार्यक्रम. यात साहित्यिकांबरोबरच जलसंधारण कार्यात कृतिशील सहभाग असणाऱ्या कार्यकर्याचा व ग्रामीण जनतेचाही सहभाग आहे. यात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भोगावती नदीवर १०० वर्षांपूर्वी ‘लक्ष्मी’ जलाशयाची निर्मिती केली. त्या प्रकल्पाबाबत शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संमेलन कोल्हापुरात आयोजित करण्यात आले आहे.