News Flash

मध्यवर्ती कारागृहात आणखी ९ मोबाईल सापडले

तपास पथकाने केलेल्या पाहणीत मध्यवर्ती कारागृहात आणखी ९ मोबाईल आणि १७ मोबाईलच्या बॅटरीज् सापडल्याने खळबळ उडाली आहे.

| April 18, 2015 12:50 pm

तपास पथकाने केलेल्या पाहणीत मध्यवर्ती कारागृहात आणखी ९ मोबाईल आणि १७ मोबाईलच्या बॅटरीज् सापडल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सापडलेल्या मोबाईलची संख्या १०९ वर जाऊन पोहोचली आहे. मध्यवर्ती कारागृहात अनियमितता असल्याचे वेळोवेळी जाहीर झाल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याची परिणीती ३१ मार्चच्या पहाटेला झाली. या दिवशी कारागृहातून पाच आरोपी पळून गेले. आज या घटनेला सतरा दिवस पूर्ण झाले असतानाही त्यांचा पोलिसांना शोध लागला नाही. या घटनेने संपूर्ण पोलीस दलाचीच नाचक्की झाली. या घटनेनंतर कारागृहाच्या पोलीस महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी पाहणी केली. तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी चौकशी केली. यावेळी कारागृहाची पाहणी केली असताना त्यांना दररोज मोबाईल सापडू लागले होते. आतापर्यंत केलेल्या पाहणीत १०० मोबाईल तर ५० हून अधिक बॅटऱ्या सापडल्या आहेत. हे मोबाईल प्रत्यक्ष कैद्यांकडे व कारागृह परिसरात आढळले आहेत. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या खतरनाक गुन्हेगारांसह कुख्यात गुन्हेगार आहेत. असे असताना येथील कैद्यांना सर्वच सोयी उपलब्ध होत असल्याच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत.
या कारागृहात कधीही काहीही होऊ शकते, असे संकेत यापूर्वी याच कारागृहातील काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 12:50 pm

Web Title: 9 mobile found in nagpur central jail
टॅग : Mobile
Next Stories
1 नव्या सेंद्रीय शेती धोरणाची शेतक ऱ्यांना प्रतीक्षा
2 उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रवासी तिकीट दरात वाढ
3 चौकशी समितीचा अहवालच नाकारण्याचा वनखात्याचा प्रयत्न
Just Now!
X