06 August 2020

News Flash

सांगोल्यात ९० लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

सांगोल्याजवळ सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून स्कॉर्पिओ गाडीतून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे दीड किलो सोने व ८३ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. गाडीतील तिघाजणांना

| January 9, 2013 04:51 am

सांगोल्याजवळ सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून स्कॉर्पिओ गाडीतून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे दीड किलो सोने व ८३ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. गाडीतील तिघाजणांना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील राहणारे आहेत.
एमएच ५० ए ५२०० या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सांगोला येथे पोलिसांनी सापळा लावला. गाडी टप्प्यात येताच पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता, त्यात गाडीच्या पाठीमागच्या आसनाखाली दडवून ठेवलेले दीड किलो सोन्याचे दागिने व ८३ किलो चांदीचे दागिने सापडले. संशय बळावल्याने गाडीतील व्यक्तींची झडती घेतली असता, त्यापैकी एकाकडे पाच जिवंत काडतुसासह रिव्हॉल्व्हर आढळून आले. मोहन श्यामराव वाईंगडे (वय ५१), अभिजित कुंडले (वय २३) व चालक समीर सज्जन शिकलगार (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले.
हे दागिने नांदेड येथे पोहोचवण्यासाठी हुपरी येथून निघालो होतो, अशी माहिती अटक झालेल्या तिघांकडून मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2013 4:51 am

Web Title: 90 lakh rs gold and silver jewellery seized in sangola
Next Stories
1 सोलापुरात एकाच वेळी चार मोटारसायकलींच्या चोरी
2 राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रमुखांमध्येच खडाजंगी
3 संगमनेरजवळ अपघातात ३ भाविक ठार
Just Now!
X