सायबर ट्रस्टचे संस्थापक डॉ. ए. डी. शिंदे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुर्मिळ कॅमेरा, दुर्मिळ पोस्ट तिकिटे व फस्ट डे कव्हर प्रदर्शनाचा समावेश होता. रक्तदान शिबिरात १५०वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांच्या स्मृती शिल्पस्थळावरील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. रणजित शिंदे, शशिकांत भोसले, डॉ. बेळगुंद्री, संचालक एम. एस. अली, सल्लागार डॉ. व्ही. एम. हिलगे उपस्थित होते. प्रा. बी. एम. भोसले यांच्या ७८६ क्रमांकाच्या नोटांचे प्रदर्शन व सर्वेश देवरूखकर यांच्या कॅमेऱ्याच्या प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे पर्यावरणविषयक फिल्म प्रदर्शन, शैक्षणिक साधने प्रदर्शन व नाटय़प्रवेश स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.