शहरातील नामांकित सहकारी रुग्णालयातील एका डॉक्टराने प्रेमाचे नाटक करून परिचारिकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी त्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
डॉ. दीपक नागनाथ वाघमोडे (वय २५, रा. कोळेगाव, ता. मोहोळ) असे अटक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्याचे वडील नागनाथ वाघमोडे यांनी या गुन्ह्य़ात मदत केल्याचा आरोप असून त्यांना यापूर्वीच अटक झाली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली, तर आतापर्यंत फरारी असलेल्या डॉ. दीपक वाघमोडे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे.