कराडचे ग्रामदैवत श्री उत्तरालक्ष्मी देवीचा माघ पौर्णिमा यात्रा उत्सव येत्या गुरूवारी (दि. २१) सालाबादप्रमाणे पालखी प्रदक्षिणेने सुरू होत आहे. हा यात्रा उत्सव नियमित धार्मिक कार्यक्रमाने २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
यात्रा उत्सवात येत्या शुक्रवारी (दि. २२) सकाळी ८ वाजता उत्तरालक्ष्मी मंदिरात देवीचा अभिषेक मंत्रो उपचार, पूजा. दुपारी नैवेद्य सायंकाळी ५ ते साडेसहा ब्रम्हचैतन्य भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी(दि.२३) सायंकाळी साडेचार ते साडेपाच यावेळेत रामकृष्ण गीता मंडळाचा स्त्रोत पठणाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. २४) सायंकाळी साडेचार ते साडेपाच श्री उत्तरालक्षमी श्री सूक्त मंडळाचा श्री सूक्त पठणाचा कार्यक्रम तसेच सोमवारी (दि. २५) सकाळी साडेदहा वाजता रामकृष्ण गीता मंडळाचा सप्तशिती पठणाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री दहा वाजता कुंभार समाजाचा देवीच्या मानाचा गोंधळ होऊन मंगळवारी (दि. २६) सकाळी पाकाळणी होऊन यात्र उत्सवाची सांगता होणार आहे. तरी कराडकरांनी ग्रामदैवत उत्तरालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवाचा आवर्जुन लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापक पुजारी बंधुंनी केले आहे.