रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व रोटरी क्लब डाऊन टाऊनतर्फे रविवारी १२ मे रोजी आई महोत्सवाचे आयोजन केले आहे. अवघड परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांचा विकास आणि शैक्षणिक प्रगती करणाऱ्या मातांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
रघुवीरनगरमधील रोटरी हॉलमध्ये संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉन बॉस्को शाळेच्या संचालिका कै. रिटा पॉल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी जननी आशीष संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्तिदा प्रधान उपस्थित राहणार आहेत. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातांची माहिती योगेश झांबरे ९८२१०६२६९४, शंकर साठवणे ९८२१९३८६१८ यांना द्यावी.