भ्रष्ट्राचारविरहित खात्यांमध्ये ‘आप’चा खाजगीकरणाला विरोध असून दलालांचा सुळसुळाट असल्याने ग्राहकांची पळवणूक होत आहे. जोपर्यंत औद्योगिक पट्टा विकसित होत नाही, तोपर्यंत नागरिकांचे राहणीमान उंचाविणार नाही. महाराष्ट्रामध्ये औद्यगिक पट्टयामध्ये फॅक्टरी चालवण्यासाठी विविध प्रकाराचे लायसन्स घ्यावे लागतात. त्यामुळे ३५ टक्के इंडस्ट्रिअल फॅक्टरी बंद पडल्या आहेत, असे मत ऐरोली येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घानप्रसंगी राष्ट्रीय समितीचे सदस्य मयक गांधी यांनी व्यक्त केले.
 महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष हा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप मयंक गांधी यांनी केला. ‘आप’ हा पक्ष महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ जागा लढवणार असून राष्ट्रवादी कॉगेसच्या  २२ जागांविरोधात जास्त लक्ष केद्रित करणार आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी हा आमचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे. कारण राष्ट्रवादीमधील शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे आदि नेत्यांनी मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप मयक गांधी यांनी केला असून सरळता, सहजता आणि सदिग्धता या तीन तत्वावर सेवा करणार आहे, असे मयंक गांधी म्हणाले.
यावेळी आपची भुमिका मांडताना मयक गांधी म्हणाले की, आप पक्ष आंदोलनांमध्ये उतरल्यांवर पालकमंत्री गणेश नाईक घरात लपून बसतील. रस्त्यांवर आकरल्या जात असलेल्या टोल वसुलीमध्ये भ्रष्टाचार होत असून ३१ जानेवारीपर्यंत सरकारने टोलबाबत जाहीर भुमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनामध्ये जनतेला पाठिबा देऊ, असेही मयंक गांधी यांनी सांगितले.  
कॉग्रेसने ‘आप’ला दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या वेळी पाठिबा दिल्यामुळे आता कॉग्रेस काही कृती करु शकत नाही. जनलोकपालाची अंमलबजावणी झाल्यावर भ्रष्टाचारी मंन्न्यांना तुरुगांत टाकण्याचा इशारा ‘आप’ने दिला आहे. दिल्लीचे आमदार बिन्नी यांची राजकीय महत्वकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे ते पक्षावर टीका करत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यांनतर के.आर.गोपी यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला असून तब्बल अडीच वर्षांनंतर के.आर.गोपी यांनी ‘आप’चा झाडू हाती घेऊन ऐरोली येथे ‘आप’चे भव्य कार्यालय उघडले आहे.