गोखले महाविद्यालयातील आमदार दिलीपराव देसाई डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट विभागाचा विद्यार्थी अभिजित बोरगुले याची दक्षिण कोरियातील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी येथे ‘एम्बेडेड इमेज सिस्टिम’ या विषयातील एम.एस.प्लस पीएच.डी. या संयुक्त अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ जे.श्रीनिवासन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिजित बोरगुले याचा सत्कार करण्यात आला. भारतातून निवड झालेल्या फक्त दोन विद्यार्थ्यांपैकी अभिजित हा एक आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. गोखले कॉलेज व चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया यांच्यामध्ये झालेल्या शैक्षणिक करारामुळे हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे, असे मत प्रा. जयकुमार देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या विद्यार्थ्यांस प्रा. डॉ. मंजिरी देसाई-मोरे, प्राचार्य डॉ. जे. बी. पिष्टे, डॉ. सी. एच. भोसले, डॉ. ए. व्ही. मोहोळकर आदींचे सहकार्य लाभले.