News Flash

कार आणि जीपची धडक; दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

हैदराबादहून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारला जीपने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. कारचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गड

| August 12, 2013 01:58 am

हैदराबादहून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारला जीपने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. कारचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गड पाटीजवळ रविवारी दुपारी हा अपघात घडला.
राजेंद्र काíतक व मधुमती काíतक हे त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीसह हैदराबादहून शिर्डीकडे देवदर्शनासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्गावर गड पाटीजवळ उस्मानाबादकडे येणाऱ्या जीपने (एमएच २५- आर ९१८) त्यांना जोराची धडक दिली. अपघातात कारमधील राजेंद्र काíतक (वय ३१), मधुमती काíतक (वय ३०) व चालक रवि गायकवाड (वय ४०) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. काíतक दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगी बेबी ही या अपघातात ठार झाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी सकाळी याच महामार्गावर बस आणि कंटेनरच्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी महामार्गावर अपघात झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:58 am

Web Title: accident car jeep two years girl death
टॅग : Osmanabad
Next Stories
1 यवतमाळ जिल्ह्य़ातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी दोन पथके
2 राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, विविध संघटनांकडून आवाहन
3 तायक्वांदो चाचणीसाठी १४२ खेळाडूंचा सहभाग
Just Now!
X