02 December 2020

News Flash

ट्रकखाली चिरडल्याने मुलाचा मृत्यू मृतदेह लपविण्याचा प्रयत्न

मानखुर्द येथे सापडलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह हे हत्या प्रकरण नसून ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ट्रकचालक आणि क्लीनरला याप्रकरणी अटक केली

| January 10, 2015 06:47 am

मानखुर्द येथे सापडलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह हे हत्या प्रकरण नसून ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ट्रकचालक आणि क्लीनरला याप्रकरणी अटक केली आहे.
नासीर शेख (१३) हा मुलगा कुटुंबीयांसमेवत मानखुर्द मंडाला येथे राहत होता. गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह घराजवळील रस्त्यावर आढळळा होता. त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज होता.
पण त्याच्या डोक्यावरील जखमेचे स्वरूप पाहता वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्वरित त्या दृष्टीने तपास करून या भागातील ट्रकचालक मोहम्मद खान (२१) आणि क्लीनर असलम खान (३८) या दोघांना अटक केली.
पहाटे सहाच्या सुमारास खान आपला ट्रक मागे घेत असताना घराबाहेर झोपलेल्या नासीर शेखला ट्रकने चिरडले होते. या प्रकाराने घाबरलेल्या चालक आणि क्लीनरने आपल्यावर आळ येऊ नये म्हणून नासीरचा मृतदेह रस्त्यावर उचलून टाकला होता.
मानखुर्द पोलिसांनी या दोघांना निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरणे आणि पुरावा नष्ट करणे या गुन्ह्य़ात अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:47 am

Web Title: accident in mankhurd
Next Stories
1 अभिनेत्रीवर बलात्कार करणाऱ्या निर्मात्यास अटक
2 ८० लाख रुपयांचे एमडी जप्त
3 हे प्रभू तुम्ही पुन्हा पुन्हा या..
Just Now!
X