येथील धुनीवाले मठाजवळ आज दुपारी चार वाजता झालेल्या एका अपघातात तीन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. येथील साईबाबा गुड्स गॅरेजचा मालवाहू ट्रक नागपूरहून वध्र्याला येत होता. ट्रक धुनीवाले मठाजवळ येताच ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यात ट्रकच्या बाजूनेच दुचाकीवरून जाणारे संदीप मधुकर काळे (४०) व त्यांची पुतणी तनया काळे चिरडले गेले, तसेच सायकल स्वार पांडुरंग रघाटाटे यांचाही जागीच मृत्यू झाला. अन्य दोघांनाही मार बसला.
ट्रकच्या धडकेने भिंतही कोसळली
भरधाव जाण्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक धुनीवाले मठाच्या कार्यालयाच्या जवळच असलेल्या झाडाला धडकूनच शेवटी थांबला. यामुळे कार्यालयाची भिंतही कोसळली.
अपघात होताच ट्रकचालक व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाले.
मृत काळे हे याच परिसरातील रहिवासी आहेत. पुतणीसह ते सहज फि रायला घराबाहेर पडले असतांना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
हा परिसर सदैव गजबजलेला असतो. घटनास्थळावर स्पीडब्रेकर देखील आहे. त्यामुळे वाहनाची गती मंदावलीच असते, परंतु अपघात करणारा ट्रकचालक मद्यधुंद असल्यानेच हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याप्रकरणी वर्धा शहर पोलीस तपास करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 3:43 am