News Flash

येवल्यातील अपघातात तीन ठार

नातलगाच्या दशक्रिया विधीसाठी मोटारसायकलने जात असता शहराजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. बुधवारी सकाळी हा अपघात झाला. तालुक्यातील एरंडगाव येथील रहिवासी बाबुराव नामदेव आहेर

| January 17, 2013 01:13 am

ट्रकवर मोटारसायकल धडकली
नातलगाच्या दशक्रिया विधीसाठी मोटारसायकलने जात असता शहराजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. बुधवारी सकाळी हा अपघात झाला.
तालुक्यातील एरंडगाव येथील रहिवासी बाबुराव नामदेव आहेर हे नातलगाच्या दशक्रिया विधीसाठी ठाणगाव येथे जाण्यास निघाले. त्यांच्या समवेत मोटारसायकलवर पत्नी यमुना व मुलगा राहुल हे होते. मोटारसायकल येवल्यातील बस स्थानकाजवळ येताच अस्ताव्यस्तपणे उभ्या असणाऱ्या रिक्षांच्या अतिक्रमणामुळे समोरील वाहनाचा नेमका अंदाज आहेर यांना आला नाही. त्यातच नगर-मनमाड रस्त्याने येणाऱ्या ट्रकवर मोटारसायकल धडकली. धडक इतकी जबर होती की आहेर यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा हे जागीच ठार झाले.
एकाच कुटुंबातील तिघांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. बस स्थानकासमोर सतत असणारे रिक्षा चालकांचे अतिक्रमण हा विषय यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. रिक्षा चालकांच्या मनमानीविषयी याआधीही नागरिकांनी तक्रारी केल्या असून त्यांच्या अतिक्रमणामुळेच हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. रिक्षा चालकांना शिस्त लावण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 1:13 am

Web Title: accident in yevlathree dead
Next Stories
1 इगतपुरीतील उपसा सिंचनासाठीही मिळणार दारणा धरणाचे पाणी
2 नूतन विद्यामंदिर मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण विजेते
3 विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांची जोपासना करावी- पोलीस आयुक्त
Just Now!
X