कोपरखैरणे सेक्टर-५ येथील सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतीवर सिडको व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये इमारतीचा स्लॅब व प्लिन्थ तोडण्यात आला. सिडकोच्या भूखंडावर शिवराम म्हात्रे यांनी अतिक्रमण करून ते तेथे इमारतीचे बांधकाम करत होते. या संदर्भात सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने म्हात्रे यांना नोटीस बजावली होती, परंतु या नोटिसीकडे दुर्लक्ष करीत बांधकाम सुरू ठवले. अखेर सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या अतिक्रमण पथकाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त केले. सिडकोचे अतिक्रमणविरोधी आधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी व पोलिसांच्या बदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.