News Flash

‘काळी फिल्म’ लावणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी ?

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर गाडय़ांच्या काचांवर काळ्या फिल्म लावण्यावर बंदी घालण्यासाठी देशभर प्रचंड आग्रह सुरू असताना महाराष्ट्रातील शहरांमध्ये मात्र याची कठोर अंमलबजावणी करण्यात शहर वाहतूक

| January 17, 2013 03:28 am

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर गाडय़ांच्या काचांवर काळ्या फिल्म लावण्यावर बंदी घालण्यासाठी देशभर प्रचंड आग्रह सुरू असताना महाराष्ट्रातील शहरांमध्ये मात्र याची कठोर अंमलबजावणी करण्यात शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. राज्यभरातील सरकारी वाहनांवर याचा सर्रास वापर होत असतानाही सरकारी वाहनांवर कारवाई करण्याची तसदी संबंधित यंत्रणा घेत नाही. काळ्या फिल्मवरील बंदी ही निव्वळ कागदोपत्री आहे.
खाजगी वाहनांवर काळ्या फिल्म सर्रास लावल्या जात आहेत तरीही ही वाहने अडविली जात नाहीत. शासकीय वाहने तर सोडून दिली जातात. त्यामुळे सरकारी यंत्रणाच काळ्या फिल्मचा प्रचार आणि प्रसार करत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काळ्या फिल्म वितरक व दुकानदारांवर पोलिस विभागाने कारवाई करण्याची गरज आहे. पण, पोलीस खाते याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. शहरात अनेक खाजगी वाहनांवर काळ्या फिल्म लावल्याने त्या वाहनाबद्दल संशयाची चित्र निर्माण होते.
काही वाहनांवर तर थेट चारही बाजूंनी काळी फिल्म लावून नियम मोडल्याचे स्पष्टपणे दिसते. पोलिसांची ही डोळेझाक का असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. गुन्हेगार मोठय़ा प्रमाणात अशा वाहनांचा फायदा घेत पसार
होतात.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशी वाहने अडथळा ठरतात. अशावेळी या संबंधीची एक मोहिम हाती घेण्याची गरज होती. पण, पोलिस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेकांनी पुन्हा त्यांच्या गाडीवर काळ्या फिल्म लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.
काळ्या फिल्म लावणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असताना तसेच ज्या वाहनांवर अशा प्रकारच्या काळ्या फिल्म लावण्यात आल्या आहेत. त्या वाहन मालकांवर सक्त कारवाई करत काळ्या फिल्म काढण्यासाठी यंत्रणेला पुढाकार घ्यावा लागणार
 आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:28 am

Web Title: action on vans wich are black glass miror
Next Stories
1 जननी सुरक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी
2 मकरसंक्रांतीला यवतमाळातील तीन शेतक ऱ्यांची आत्महत्यां
3 भोजन निविदेत लाखोंचा भ्रष्टाचार
Just Now!
X