News Flash

निर्घृण खुनानंतर तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरातील बाबा पेट्रोलपंपाजवळील वासन शोरूमच्या पाठीमागच्या बाजूला बेवारस मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून ३० वर्षांच्या व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याचे सोमवारी उघडकीस आले. मृताची ओळख

| January 15, 2013 01:04 am

शहरातील बाबा पेट्रोलपंपाजवळील वासन शोरूमच्या पाठीमागच्या बाजूला बेवारस मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून ३० वर्षांच्या व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याचे सोमवारी उघडकीस आले. मृताची ओळख पटू नये म्हणून पोटापर्यंतचा भाग जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सकाळी वासन शोरूमच्या रखवालदाराने या बाबतची माहिती पोलिसांना दिली.
वासन शोरूमच्या पाठीमागच्या बाजूला मोकळी जागा आहे. तेथे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्याला पाठीमागच्या बाजूला जखम असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. मृत व्यक्तीच्या अंगावर मळकट शर्ट व निळ्या रंगाची पँट असल्याचे  वर्णन पोलीस दप्तरी नोंदविले आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब कुंटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 1:04 am

Web Title: action to burn the body after murdered
Next Stories
1 दुष्काळ निवारणास केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी- मुंडे
2 आष्टी-पाटोद्याची टंचाई बैठक
3 कळमनुरी न्यायालयाचा आदेश,‘बीडीओ, सरपंच, ग्रामसेवकासह १० जणांवर गुन्हा दाखल करा’
Just Now!
X