News Flash

गणपती पाडा येथील अनधिकृत इमारतीवर लवकरच हातोडा

एमआयडीसीच्या जागेवरील गणपती पाडा परिसरात पेट्रोल पंपनजीक अनधिकृतपणे अंबिका इमारत उभी ठाकली आहे.

| January 13, 2015 09:01 am

एमआयडीसीच्या जागेवरील गणपती पाडा परिसरात पेट्रोल पंपनजीक अनधिकृतपणे अंबिका इमारत उभी ठाकली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी एमआयडीसीने या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली होती. मात्र त्यानंतरही बिल्डरने ही इमारत खाली न करता पुन्हा इमारत उभी केली होती. एमआयडीसीने या इमारतीच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून सदर इमारतीवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे उप अभियंता अविनाश माळी यांनी लोकसत्ताला दिली आहे.
नवी मुंबई परिसरात इमारतीत घरे घेणाऱ्या नागरिकांना आता सावध व्हावे लागणार आहे. एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात येत असलेल्या टोलेजंग इमारतीवर आता एमआयडीसी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत कारवाई करणार आहे. एमआयडीसीने शहरातील अनधिकृत बांधकामावर संरक्षण करण्याच्या उद्देशाने सुरक्षा भिंत आणि फलकदेखील टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे एमआयडीसीच्या जागा आता भूमाफियांच्या कचाटय़ातून सुटणार असून शहरातील वाढत्या अनधिकृत इमारतींनादेखील चाप बसणार आहे.
दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या एच प्रभाग समिती अंतर्गत असणाऱ्या गणपती पाडा परिसरात पेट्रोल पंपनजीक अनधिकृतपणे एमआयडीसीच्या जागेवर सात मजली अंबिका इमारत उभी राहिली आहे. बिल्डरने मनमानीप्रमाणे ही इमारत उभी केली असून एमआयडीसीने या इमारतीवर कारवाईदेखील केली होती. मात्र त्यानंतरही बिल्डरने या ठिकाणी इमारत उभी करून लाखोंची माया जमा केली होती. एमआयडीसी सदरची जागा विक्रीस काढणार असून त्यासंदर्भातील प्रक्रियादेखील सुरूकेली आहे. बिल्डरच्या मनमानीविरोधात एमआयडीसी आता न्यायालयात जाणार असल्याचे माळी यांनी सांगितले आहे.  एमआयडीसी जागेवर होणारे अनधिकृत बांधकाम त्यामुळे नवी मुंबई शहरातील हजारो नागरिकांचे घरांचे स्वप्न बिल्डरांच्या लोभापायी मातीमोल होणार आहे. एमआयडीसीच्या जागा मालकीच्या आहेत. परंतु जर का एखादा भूमाफिया चाळी किंवा इमारती बांधून विक्री करून नागरिकांची फसवणूक करीत आहे. तरी या अनधिकृत इमारतीमध्ये घरे घेऊ, असे आवाहन माळी यांनी केले आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 9:01 am

Web Title: action will be taken on illegal buildings in ganpati pada
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 रस्त्याकडेला उभ्या टेम्पोतून गृहिणींना सिलेंडर उचलण्याची शिक्षा
2 बेकायदा धार्मिक स्थळांवर दोन महिन्यांत कारवाई
3 पोलिसांच्या बॅण्ड पथकाच्या संगीताचा नागरिकांसाठी नजराणा
Just Now!
X