प्रसिद्ध मराठी व हिंदी नाटय़चित्र अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटात स्वामींची भूमिका करणार असून ही भूमिका आपल्यासाठी एक आव्हान असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
या भूमिकेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने जोशी यांनी त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठास भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. येत्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात मोहन जोशी यांच्यासह प्रिया बापट, मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर असे प्रसिद्ध कलाकारही विविध भूमिका करणार आहेत.
पीठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट असा प्रवास श्री स्वामी समर्थ महाराजांनी केला आहे. दिंडोरीप्रणीत सेवामार्गाने स्वामींचे कार्य घराघरांत पोहोचविले. त्यामुळे या तीक्र्षक्षेत्राबरोबरच दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथेही या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.
सुमारे १७५ हिंदी, १०० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये, १०० पेक्षा अधिक नाटकांमध्ये आणि असंख्य टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केलेली असतानाही स्वामींची भूमिका आपल्यातील कलाकारासाठी आव्हान असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी सेवामार्गाचे प्रणेते अण्णासाहेब मोरे यांची भेट घेतली. उपस्थित सेवेकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. इतर कलाकारांनी चित्रपटातील भावगीते सादर केली.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie
“१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…