News Flash

कलावंत अजूनही उपेक्षित

महाराष्ट्राच्या भूमीत तमाशाची खरी सुरुवात झाली.

| February 3, 2015 06:47 am

महाराष्ट्राच्या भूमीत तमाशाची खरी सुरुवात झाली. वर्षांनुवर्षे असणारी ही कला अनेक महर्षीच्या आणि लोक कलावंतांच्या माध्यमातून जगभर पोहचली. मात्र फडावर काम करणारा खरा कलावंत अजूनही उपेक्षित आहे. अशी खंत ज्येष्ठ तमाशा कलावंत भीमराव तोताराम सांगवीकर यांनी व्यक्त केली.
वाशी येथे सिडकोच्या इक्झिबिझशन सेंटरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने तमाशा-ढोलकी फड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लोककलेत ४२ वर्ष कार्यरत असणाऱ्या विठाबाई नारायण गावकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रतिवर्षी देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यंदादेखील देण्यात आला. तर तमाशा कलावंत सांगवीकर यांनादेखील हा पुरस्कार प्रभाशिवलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगवीकर यांनी हा पुरस्कार त्यांच्या भावाला समर्पित केला.  सांगवीकर यांच्या बंधूंनी भीमराव सांगवीकर यांना तमाशाची वाट दाखवली. त्यानंतर अनेक प्रसंगांतून तमाशा लोककलेची जोपसना मी माझ्या परीने केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धुळे जिल्ह्य़ातील शिवपूर तालुक्यात भिका भीमा सांगवीकर लोकनाटय तमाशा मंडळ यांच्या माध्यमातून लोककलेचा वारसा त्यांनी जोपसला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 6:47 am

Web Title: actors still expecting bhimrao sangvikar
Next Stories
1 लग्न सोहळ्यामधील आतषबाजीच्या फटाक्यांनी बालक जखमी
2 उरणमध्ये जेएनपीटी बंदरावर आधारित जागतिक प्रशिक्षण केंद्र उभारणार
3 फेरीवाल्यांच्या सामानावर पालिका अधिकाऱ्यांचा डल्ला
Just Now!
X