02 March 2021

News Flash

लातुरातील ५८ शेतक ऱ्यांना आज आदर्श पुरस्कार देणार

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्य़ातील ५८ शेतक ऱ्यांचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) महाराष्ट्र दिनी सत्कार केला

| May 1, 2013 01:28 am

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्य़ातील ५८ शेतक ऱ्यांचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) महाराष्ट्र दिनी सत्कार केला जाणार आहे.
जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली, खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. पद्मसिंह पाटील व जयवंत आवळे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, बसवराज पाटील, बाबासाहेब पाटील, वैजनाथ शिंदे, सुधाकर भालेराव, विक्रम काळे, सतीश चव्हाण, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, विनायक पाटील, चंद्रशेखर भोसले, जि.प. उपाध्यक्ष अशोक पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. दगडोजीराव देशमुख सभागृहात दुपारी २ वाजता हा सोहळा होणार आहे. शेतीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या व आधुनिक तंत्राचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविणाऱ्या शेतक ऱ्यांचा सन्मान व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे, इतर शेतक ऱ्यांना प्रेरणा मिळून उत्पादन वाढीला चालना मिळावी म्हणून हा सत्कार आयोजित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 1:28 am

Web Title: adarsh farmer award to 58 farmers in latur
टॅग : Latur
Next Stories
1 टँकर-टेम्पोच्या अपघातात २ जागीच ठार, २५ जखमी
2 परभणीत सरपंच परिषद, योजना उत्सव भरवणार
3 शिवसेना नेते गिल्डा यांचे अपघाती निधन
Just Now!
X