29 September 2020

News Flash

नॅबचे कार्य गौरवास्पद- कुलगुरू डॉ. जामकर

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) या संस्थेचे अंध व अपंगांच्या क्षेत्रात असलेले कार्य स्पृहणीय व गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू

| February 18, 2014 08:14 am

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) या संस्थेचे अंध व अपंगांच्या क्षेत्रात असलेले कार्य स्पृहणीय व गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांनी केले. अपंगत्व आले म्हणून कोणी घाबरण्याचे कारण नाही. जिद्द व परिश्रमाने सर्वसामान्यांप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दृष्टिने आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण नॅबने द्यावे, त्यासाठी संशोधन करण्यास उद्युक्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नॅबतर्फे येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री होते. व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्रमुख पाहुणे सिम्बॉयसिस सोसायटीचे समन्वयक डॉ. सी. आर. पाटील, उद्योजक राजेश उपासणी हे होते. राज्यातील १० वी, १२ वी आणि पदवीधर अशा २८ विद्यार्थी आणि चार शिक्षक व एक समाजसेवक भिमा कोळी यांचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन डॉ. पाटील व उपासणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श प्राध्यापक व आदर्श संस्था पुरस्कार डॉ. जामकर यांच्या हस्ते देण्यात आला. प्रास्तविक  मुनशेट्टीवार यांनी केले.

कार्यक्रमास आर. व्ही. श्रीगिरीवार, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक अमोल जोशी, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, लाभशंकर पंडय़ा, डॉ. सिंधु काकडे, सतीश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नाटय़लेखिका सुगंधा शुक्ल यांनी केले. आभार समिती सचिव चक्रधर जाधव यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:14 am

Web Title: admirable work by nab dr jamkar
टॅग Nasik 2
Next Stories
1 महाराष्ट्र युवा परिषदेचा ‘जाहीरनामा’
2 किमान कौशल्यास संभाषणकलेची जोड द्यावी- सोमनाथ राठी
3 ‘शतजन्म शोधिताना’सावरकर प्रेमींसाठी विशेष कार्यक्रम
Just Now!
X