26 September 2020

News Flash

अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स (नाटय़शास्त्र) विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, कुठल्याही विद्याशाखेचे पदवीधर किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी दोन वर्षांच्या या

| June 27, 2013 03:45 am

मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स (नाटय़शास्त्र) विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, कुठल्याही विद्याशाखेचे पदवीधर किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी दोन वर्षांच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. नाटकातील व इतर प्रयोगकला, ललितकला आणि दृश्यकला क्षेत्राचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक सादरीकरण, कार्यशाळा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. या अभ्यासक्रमाच्या केवळ २५ जागा असून, प्रवेश अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ८ जुलै ही आहे. प्रवेश परीक्षा १२, १३ आणि १४ जुलै रोजी सकाळी ९ वा.पासून घेण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज सकाळी ११ ते सायं. ५ वा.पर्यंत अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा मजला, विद्यानगरी कॅम्पस, कालिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई- ४०००९८ येथे, तसेच मुंबई विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in/arts/finearts/theatre/profile.html  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रवेश अर्ज academyoftheatrearts2007@gmail.com, या ई-मेलवरही स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२२-२६५४३२०९/ १०, २६५०८२०० किंवा ०९८२०६८६५०६ अथवा ०९९२०४२०३८८ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अकॅडमीचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी केले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:45 am

Web Title: admission starts at academy of theatre arts
Next Stories
1 मालेगावच्या चित्रपटाची देशभरारी!
2 शुक्रवारी ‘गझल सुफियाना’
3 खबर काढण्यासाठी खंडणीखोरांची नवी शक्कल
Just Now!
X