मुंब्र्य़ात सात मजली अनधिकृत इमारत कोसळून ७४ जणांचा बळी गेला असला तरी मीरा-भाईंदर शहरात आजही बेकायदा इमारतींची उभारणी जोरात चालू आहे. तक्रारी केल्यास केवळ कागदी घोडे नाचविणे अथवा न्यायालयाच्या स्थगिती नोटिसा दाखविणे एवढे काम महाविद्यालयांतून केले जाते.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचा कार्यभार उपायुक्त मुख्यालयात विलास ढगे यांच्याकडे आहे. परंतु अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात त्यांना अपयश आले आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या प्रभाग अधिकारी व संबंधितांवर कारवाई करण्यासही ते टोलवाटोलवी करीत आहेत. सध्या उत्तन, डोंगरी, नवघर, काशिमीरा, महाजनवाडी या भागांत चाळमाफियांनी झोपडय़ांची व चाळींची बांधकामे जोमात सुरू केली आहेत. पूर्वेकडे औद्योगिक वसाहतीत अनधिकृत गाळ्यांची बांधकामे निर्वेधपणे चालू आहेत. सिनेमॅक्समागे मृत व्यक्तीच्या नावे नऊ मजली बेकायदा इमारत पूर्ण झाली आहे.