News Flash

शिवसेनेपाठोपाठ मनसेतही अंतर्गत वादाची कुजबुज

शिवसेनेपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्य़ातील मनसेतील अंतर्गत वादाची कुजबुज सुरू झाली आहे. रिक्तपदांवरून कुरघोडय़ांना उत आला आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाचे जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार शनिवारपासून कोल्हापूर

| January 17, 2013 10:07 am

शिवसेनेपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्य़ातील मनसेतील अंतर्गत वादाची कुजबुज सुरू झाली आहे. रिक्तपदांवरून कुरघोडय़ांना उत आला आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाचे जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत असून त्यामध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये तीन जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले असले तरी शहर व जिल्हा कार्यकारिणीत पदाधिकारी निवडले गेलेले नाहीत. त्यासाठी अनेकांनी आपल्यापरीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातूनच अपेक्षित पद मिळविण्यासाठी पक्षांतर्गत कुरघोडय़ा सुरू झाल्या आहेत. याची चर्चा मुंबईपर्यंत पोहोचली आहे.त्यातूनच जिल्हा संपर्क अध्यक्ष किल्लेदार यांचा दौरा होत आहे, असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते.
जयसिंगपूर येथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. शनिवारी शिरोळ व हातकणंगले विधानसभेच्या मुलाखती तेथे होणार आहेत. रविवारी कोल्हापूर शहर, उत्तर विधानसभा, दक्षिण विधानसभा, करवीर विधानसभा तसेच राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, कागल तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्या मुलाखती होणार आहेत. सोमवारी गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड व आजरा तालुक्यात ते दौरा करणार आहेत.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 10:07 am

Web Title: after sena maharashtra navnirman sena also suffering from internal dispute in kolhapur
Next Stories
1 निवडणुकीपूर्वीच कोल्हापुरात लोकसभेचा आखाडा
2 ‘जनसुराज्य शक्ती’कडून बोगस लाभार्थीच्या चौकशीची मागणी
3 सांगोल्यातील चारा छावण्यांचा घोटाळा; दोषींवर फौजदारी खटले दाखल करावेत
Just Now!
X