News Flash

मनपाची पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम

महापालिकेच्या सुस्त झालेल्या अतिक्रमण विभागाने आज डोळे उघडले व गोकुळवाडी येथील मोकळ्या जागेत गेली काही वर्षे सुरू असलेल्या कॅरम हाऊसची पत्र्याची शेड पाडून टाकली. छावणी

| April 3, 2013 01:20 am

 महापालिकेच्या सुस्त झालेल्या अतिक्रमण विभागाने आज डोळे उघडले व गोकुळवाडी येथील मोकळ्या जागेत गेली काही वर्षे सुरू असलेल्या कॅरम हाऊसची पत्र्याची शेड पाडून टाकली. छावणी मंडळाची जागा असताना मनपाने कारवाई करण्याचे कारण काय म्हणून संबधितांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांचे काही चालले नाही.
अतिक्रमण विभागाचे प्रमुख अभियंता सुरेश इथापे यांनी ही कारवाई केली. पत्र्याच्या शेडची जागा आमच्या मालकीची आहे म्हणून श्रीमती शालिनी भारस्कर यांनी या कारवाईला विरोध केला. त्यांच्या बाजूने परिसरातील आणखी काहीजण होते. मात्र मनपाच्या पथकासमवेत पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांना कारवाई थांबवता येणे शक्य झाले नाही.
इथापे यांनी सांगितले की या कॅरम हाऊसच्या शेडबाबत मनपाकडे तक्रारी आल्या होत्या. जागा छावणी मंडळाची असली तरी या तक्रारीची दखल घेणे मनपाला भाग होते, कारण या गोकुळवाडीला अधिकृतपणे झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात आले. दरम्यान श्रीमती भारस्कर यांनी जागा आपल्याच मालकीची असून त्याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना मनपाने कारवाई केली असे सांगितले.
गोकुळवाडीतील या कारवाई बरोबरच आनंदॠषी रुग्णालयासमोरच्या टपऱ्या तसेच विक्रेत्यांच्या गाडय़ाही या पथकाने आज हटवल्या. त्यांची संख्या बरीच वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याबाबत मनपाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन आजची कारवाई करण्यात आली असे इथापे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:20 am

Web Title: again campaign against trespass by mnc
Next Stories
1 विक्रीकर निरीक्षक परीक्षेत डॉ. सुहास नवले राज्यात प्रथम
2 परीक्षा संपताच विजेचे भारनियमन सुरू
3 उघडय़ावरील अंगणवाडय़ांसाठी जि. प. ला चार कोटींचा निधी
Just Now!
X