विदर्भातील काही गावांमध्ये कृषी व पणन विभाग, मंडळ कृषी अधिकाऱ्यांमार्फत घरच्या घरी बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, तसेच शेतकऱ्यांना कृ षी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत.
विदर्भात धानपट्टा वगळता इतर जिल्ह्य़ांमध्ये सोयाबीन हेच प्रमुख पीक आहे. सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करताना घरचे बियाणे चाळणी क रून त्यामधील काडी कचरा, खराब दाणे, खडे साफ करून घ्यावे. पटकर ओले करून घ्यावे व सोयाबीनचे १०० दाणे घेऊन एका ओळीत १० बिया याप्रमाणे १० ओळी मांडाव्यात. त्यावर दुसरे ओले केलेले गोणपाट किंवा पटकर चार-पाच दिवस ओले राहण्याकरिता त्यावर दररोज हलके पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर १०० दाण्यांपैकी किती बियांना कोम आले ते पहावे. गोणपाट-पटकराऐवजी आपण कागदाचाही वापर करू शकता. कागदाच्या एका कागदास चार घडय़ा पाडून तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येक १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून कागदाच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रितीने १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार कराव्या. नंतर या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यात बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. आपणास जर ७० बियांना अंकुर फुटलेले दिसून आले तर बियाणांची उगवण क्षमता ७० टक्के आहे, असे समजावे.
पेरणीपूर्वी बियाणास ३ ग्रॅम थायरम किं वा ३ ग्रॅम कार्बन्डोझीम, २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबीची बिज प्रक्रिया करावी. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पध्दत तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून १५ टक्के बियाणे कमी लागेल व पावसात खंड पडल्यास पिकास ओलावा मिळेल किंवा जास्त पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी सऱ्यांमधून वाहून जाईल, अशा प्रकारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बुलढाणा तालुक्यातील सव, खुपगाव, केसापूर, माळवंडी मातला, सिंदखेड व रायपूर येथे ए.टी.सुरडक र यांनी मार्गदर्शन केले. तसेच उमरखेड येथील प्रगतीशिल शेतकरी रमेश पाटील यांच्या शेतावर बी.बी.एफ.प्लॅंटर व बेड मेकरचे प्रात्याक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. या कार्यक्रामासाठी ए.टी.सुरडकर, आर.टी.पवार, कृषी सहायक जी.टी.सरदार, एस.एस.शहाणे, आर.टी.म्हस्के, एन.व्ही.इंगळे, डी.बी.जेऊघाले यांनी सहभाग घेतला.