ऐरोलीतील नाटय़ कलावंत आणि रसिकांचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात साकार होणार आहे. सारस्वतांच्या अनेक दिवसांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून महापालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक नाटय़गृह साकारण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभाचा नारळ बुधवारी वाढविण्यात आला आहे.
ऐरोली सेक्टर-५ येथील दत्त मंदिरानजीकच्या सिडकोच्या भूखंडावर महापालिकेच्या माध्यमातून हे नाटय़गृह साकारण्यात येणार आहे. स्थानिक आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते नाटय़गृहाचे भूमिपूजन पार पडले आहे.
या ठिकाणी नाटय़गृह उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी, मानव विकास फांऊडेशन आदी विविध सामाजिक संस्था, नाटय़प्रेमी, नागरिक महापालिकेकडे केली होती. यामागे तसे कारणदेखील होते.  ऐरोलीकरांना नाटक पाहण्यासाठी ठाणे तसेच वाशी या ठिकाणी यावे लागत होते. यामुळे या ठिकाणी नाटय़गृह उभारण्याची मागणी जोर धरू लागली होती. ही मागणी पूर्ण झाल्याने ऐरोलीकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
नाटय़गृहाच्या तळाला पाìकग प्लाझा, सभोवताली जॉिगग ट्रॅक, नाटकाबरोबरच चित्रपटगृह त्याचबरोबर इतर सोयी-सुविधांनी परिपूर्ण असे नाटय़गृह साकारणार येणार आहे.
असे असेल  नाटय़गृह
* बेसमेंट – पहिला स्तर ४४ वाहनांसाठी पाìकग, दुसरा स्तर ४३ वाहनांसाठी पाìकग व तीन लिफ्ट. ’ तळमजला- तिकीट खिडकी, महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन प्रसाधनगृहे, एक तालीम रूम, मुख्य प्रवेशद्वार आणि प्रदर्शन सभागृह. ’ पहिला मजला- मेकअप रूम, महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन प्रसाधनगृहे, अपंग महिला व पुरुषांसाठी एक प्रसाधनगृह, स्नॅक्स सेंटर.  ’ दुसरा मजला – एक ग्रीन रूम, प्रशासकीय विभाग, एक बहुपयोगी सभागृह. ’  तिसरा मजला- अधिकारी विभाग, एक अतिथी कक्ष, स्नॅक्स सेंटर. ’ चौथा मजला-दोन विशेष अतिथी कक्ष, एक अधिकारी विभाग.