अखिल भारत शिक्षा संघर्ष यात्रा २८ नोव्हेंबरला विदर्भात पोहोचत आहे. या यात्रेत व प्रबोधनाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
शिक्षणाचे खासगीकरण, महागडे शिक्षण, शिक्षणाची खरेदी-विक्री व शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण यांच्या विरोधात व शिक्षणाचे स्तरीकरण संपवण्यासाठी सर्वाना मोफत, गुणात्मक आणि समान शिक्षण मिळण्यासाठी, समान शाळा पद्धतीचा आग्रह धरण्यासाठी अखिल भारत शिक्षा अधिकारी मंचद्वारा अखिल भारत शिक्षा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा प्रारंभ झाली असून ४ डिसेंबरला समाप्त होणार आहे. ही यात्रा देशात पाच विभागवार उत्तरपूर्व, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमेकडून काढण्यात आली आहे. ही यात्रा २८ नोव्हेंबरला विदर्भात प्रवेश करेल. या यात्रेचे ३० नोव्हेंबरला नागपुरात सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. ३० नोव्हेंबरला तिन्ही मार्गातील यात्रा नागपूरला पोहोचतील व प्रबोधनाचा कार्यक्रम होईल. १ डिसेंबरला संघर्ष यात्रा नागपूरहून बैतुलकडे प्रस्थान करेल. ३० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सक्करदरा चौक उमरेड रोडवरील सेवादल महिला महाविद्यालयात अ‍ॅड. गोविंद पानसरे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, कुलदीपनाथ शुक्ला, प्रा. दिलीप चव्हाण, नागेश चौधरी मार्गदर्शन करतील. संघर्ष यात्रेच्या नियोजनासाठी गावोगावी व शहरात विविध ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रबोधनाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन