गेल्या दोन महिन्यांपासून या जिल्ह्यातील हजारो महिलांनी यवतमाळ, वणी, घाटंजी, मोहदा, मारेगाव, पांढरकवडा, उमरखेड, पुसद, सदोबासावळीसह अनेक ठिकाणी जिल्ह्यात तात्काळ दारुबंदी व्हावी, या एकमेव मागणीसह रणरणत्या उन्हात रस्त्यावर येऊन जो एल्गार केला. हा जनमानसाचा या मागणीला असलेला अभूतपूर्व पाठिंबा असून या जिल्ह्यात कधीही न दिसलेला सामान्य जनतेचा गरराजकीय व सामाजिक आंदोलनाला मिळत असलेला सहभाग साऱ्या राजकीय पक्षांना गंभीर निरोप आहे. आता आपले राजकीय दुकानांचे अस्तित्व वाचविण्यासाठी या जिल्ह्यात तात्काळ दारूबंदी करावी व झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करून लोकांच्या भावनांचा आदर करावा. नाही तर आता या हजारो आईबहिणींचा असंतोष रौद्ररूप धारण करण्यापूर्वी आपली लोकलाज वाचवा, अशी विनंती शेतकरी नेते व सामाजिक कार्यकत्रे किशोर तिवारी यांनी केला आहे.
सध्या जिल्ह्यात हजारो मायबहिणी दारूमुळे झालेल्या संसाराच्या नासाडीच्या वेदनादायी कथा घेऊन मोच्रे, रास्तारोको, धरणे करत असून यावरून आता हे आंदोलन जनांदोलन झाले आहे. हा वणवा कधीही पेटू शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांचे दारू काढण्याचे कारखाने बंद पडणार असल्यामुळे हे आमदार व मंत्री चूप आहेत. हे सर्व आमदार व खासदार या जिल्ह्यात दारुबंदीची मागणी एक होऊन सरकारजवळ रेटतात तर एका दिवसात यवतमाळ जिल्ह्यात तात्काळ दारुबंदी होऊ शकते. मात्र, आपला कार्यकत्रे व ठेकेदारांना ठेके देण्यासाठी एक होणारे आमदार व मंत्र्यांना या आंदोलनाचे चटके लावण्याची गरज असून यवतमाळ जिल्ह्यातील आयाबहिणींनी या नेत्यांना जाब विचारला पाहिजे, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे. सध्या हे आंदोलन सामाजिक नेत्यांनी व वंचितांनी आपले गरराजकीय नेतृत्व निर्माण करून अण्णांच्या ‘लोकपाल’ आंदोलनाची आठवण ताजी केली आहे. आता पोटभरू नेत्यांनी व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लोकांच्या दुखाची व वेदनाची  दखल घ्यावी व दारूबंदीची मागणी मान्य करावी. नाही तर, पुढे हेच आंदोलन त्यांचा धंदा बंद करू शकतो, असा इशाराही त्यांनी यांनी दिला आहे.
जनता दरबारातच पालकमंत्र्यांना घेराव
शहरात पालकमंत्री व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा बचत भवनात दरबार सुरू असताना दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या संगीता पवार त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह जनता दरबारात पोहोचल्या व त्यांनी २० एप्रिलच्या महामोर्चादरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेल्या मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळ भेटण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. तेव्हा पालकमंत्री म्हणाले, आजच सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोललो. लवकरात लवकर दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या शिष्टमंडळाशी या प्रश्नावर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले आहे.
जर जिल्हा दारूबंदीबाबत आपण उदासीन असाल तर मी व माझ्या २५ हजार महिला भगिनी ‘प्राणत्याग आंदोलन करणार आहोत. एकतर जिल्हा दारूबंदी करा, अन्यथा आमचा जीव घ्या, असे संगीता पवार म्हणाल्यावर याप्रसंगी काही वेळ जनता दरबार स्तब्ध झाला होता. आंदोलनाचे प्रवक्ता लीलाधर दहीकर, तालुका समन्वयक नंदू मंडाळे, अक्षय मेश्राम, ज्योती ओंकार आणि विविध गावातील दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या महिला या वेळी उपस्थित होत्या.