News Flash

आकाशवाणीत विविधरंगी ‘गोफ’ रंगला

आकाशवाणीच्या ८८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आकाशवाणी मुंबईतर्फे चर्चगेट येथील आकाशवाणी सभागृहात नुकतेच 'गोफ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण साळुंखे (क्लोरोनेट),

| July 30, 2015 12:07 pm

आकाशवाणीच्या ८८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आकाशवाणी मुंबईतर्फे चर्चगेट येथील आकाशवाणी सभागृहात नुकतेच ‘गोफ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात बाळकृष्ण साळुंखे (क्लोरोनेट), कैलाश पात्रा (व्हायोलिन), रुपक कुलकर्णी (बासरी), प्रदीप हुसेन (मेंडोलिन) यांनी संगीत धूनने केली. त्यानंतर कार्यक्रम अधिकारी हेमंत सकपाळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व संगीतकार अभिजीत लिमये यांच्या संगीत संयोजनात आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांच्या संकेत धून सादर करण्यात आल्या.
आकाशवाणीशी गेली अनेक वर्षे संबंधित असलेल्या काही मान्यवरांशी निवेदक किशोर सोमण यांनी संवाद साधला. गायक व संगीतकार पं. यशवंत देव यांनी ‘महाराज काय पाहत आहात वरून’ ही कविता सादर केली. डॉ. बाळ फोंडके यांनी आपल्या अवतीभवती पसरलेल्या विज्ञानाची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली तर विज्ञानाचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले. गायिका सुलोचना चव्हाण यांनी ‘मला म्हणतात हो लवंगी मिरची’ या गाण्याने लावणीच्या कळसापर्यंत पोहोचविले, असे सांगितले. तर लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘माणूस मारला’ हे गीत सादर केले.
सुषमा देशपांडे यांच्या निवेदनानंतर आविष्कार व अजिर निर्मित ‘आयदान’ हा नाटय़ एकांक साद करण्यात आला. या वेळी आकाशवाणीच्या संग्रहातील बालगंधर्व, डॉ. वसंत गोवारीकर, विंदा करंदीकर, बाळ कोल्हटकर, पं. जसराज, दिलीपकुमार यांचे दुर्मीळ ध्वनिमुद्रण ऐकविण्यात आले.
आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक एम. एस. थॉमस यांनी प्रास्ताविक केले. उपमहासंचालक (अभियांत्रिकी) सुधीर सोदिया व उपसंचालक सुजाता परांजपे यांच्या हस्ते उपस्थित निमंत्रितांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आकाशवाणीचे रसिक श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. काही श्रोत्यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:07 pm

Web Title: all india radio
Next Stories
1 न्यायासाठी पित्याची एकहाती लढाई
2 प्रतिपूर्ती व शिष्यवृत्ती योजना
3 धोरण दिरंगाई गोविंदांच्या पथ्यावर!
Just Now!
X